आता पालकांवर भार नको, युवकांनो घराबाहेर पडून मिळेल ते काम स्वीकारा – रोहित पवार

0
549

पिंपरी,दि.११(पीसीबी) – आता पालकांवर भार नको, युवकांनो घराबाहेर पडून मिळेल ते काम स्वीकारा, असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून केला आहे. योग्य काळजी घेऊन आपल्याला आता घराबाहेर पडावं लागेल. आपण असेच घरात बसून राहिलो, तर या संकटाची उंची एवढी वाढेल की त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल. त्यामुळे युवकांनो, आता आपल्या पालकांवर जबाबदारी टाकू नका, कोणतंही काम लहान-मोठं न समजता स्वीकारा, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

“कोरोनाला हरवण्यासाठी लॉक डाऊन केल्याने गेली काही महिने आपण घरात आहोत. पण आता परिस्थिती बदलतेय व लॉक डाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणलीय. तरीही लोकांमध्ये अजून भीतीचं वातावरण आहे. पण योग्य काळजी घेऊन आपल्याला आता घराबाहेर पडावं लागेल. कारण गेल्या दोन-तीन महिन्यात आर्थिक संकटाचा डोंगर दररोज नवनवी उंची गाठतोय. आपण असेच घरात बसून राहिलो तर या संकटाची उंची एवढी वाढेल की मग त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल.” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान मुलांनी आता पालकांवर जबाबदारी न टाकता त्यांची काळजी घेऊन आणि स्वतः पुढं येऊन जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण वयोमानानुसार शुगर, किडनी, हार्ट, मधुमेह, दमा, रक्तदाब अशा प्रकारचे आजार पालकांना असू शकतात. त्यामुळे अशा पालकांनी तसंच गर्भवती महिला व 55 वर्षांपुढील नागरिक यांनी स्वतःची काळजी घेऊन मुलांना नोकरीसाठी पाठवणं फायद्याचं होऊ शकतं. पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी नोकरीला गेल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोर पाळून पुन्हा घरी जाणं टाळायला पाहिजे.” असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.

कोरोनाला हरवण्यासाठी लॉक डाऊन केल्याने गेली काही महिने आपण घरात आहोत. पण आता परिस्थिती बदलतेय व लॉक डाऊनमध्ये मोठ्या…

Gepostet von Rohit Rajendra Pawar am Mittwoch, 10. Juni 2020