आता अमोल कोल्हेनंतर राजू शेट्टी करणार उद्यनराजेंची मनधरणी  

0
566

सातारा, दि. ४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी   खासदार  उदयनराजे यांची साताऱ्यातील निवासस्थानी भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली होती. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी उद्यनराजे यांची आज (बुधवार) भेट घेऊन त्यांची मनधरणी करणार असल्याची माहिती मिळत आहे .

उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.  त्यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत. खासदार  कोल्हे यांनी  उदयनराजेंची मनधरणी करण्यासाठी भेट घेतली होती.  या दोन्ही नेत्यांमध्ये  सुमारे तासभर चर्चा झाली.  त्यानंतर मीडियाशी बोलताना कोल्हे यांनी उदयनराजे यांना शुभेच्छाही दिल्या आणि मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही, असे म्हटले  होते.

आता राजू शेट्टी उद्यनराजे यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करू नये, यासाठी त्यांचे मन परिवर्तन करणार आहेत. आता शेट्टी यांना उद्यनराजेंचा यांची मनधरणी करण्यात यश येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मला खो घालण्याचा प्रयत्न करू नये, असा सुचक इशारा उद्यनराजे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यनराजे यांचा भाजप प्रवेश पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत करण्यास इच्छुक असल्याचे समजते.