‘….आणि तब्बल सव्वा लाखाचे गंठण झाले गायब’

0
407

तळवडे, दि. १२ (पीसीबी) – त्रिवेणीनगर येथे एका घरातून अज्ञात चोरट्याने एक लाख 28 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. ही घटना 15 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीत घडली.

शशिकला रामदास निर्वाण (वय 64, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 22 ग्रॅम वजनाचे एक लाख 28 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.