आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल – संजय राऊत

0
343

मुंबई,दि.२(पीसीबी) – “खातेवाटपावरून महाविकास आघाडीत कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप झालेलं आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून विलंब झालेला नाही. आज (२ जानेवारी) सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये संवाद राहावा. अनेक मुद्यांवर चर्चा व्हावी म्हणून शरद पवार यांनी सुकाणू समिती स्थापन करण्याची सूचना केली होती. या समितीतील तिन्ही पक्षाचे नेते भेटत असतात. खातेवाटपावरून कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये आधीच खातेवाटप झालेलं आहे. पक्षातंर्गत खातेवाटपाचा प्रश्न शिल्लक होता. तोही जवळपास सुटला असून, संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल,” असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिनाभरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर खातेवाटपसंदर्भातही विलंब होत असल्यानं महाविकास आघाडीत खातेवाटपावरून कुरबुरी सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे.