आज कामगार संघटनांनी बंद का पुकारला आहे? जाणून घ्या सविस्तर वृत्त

0
299

मुंबई, दि.८ (पीसीबी) – सर्वच सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे सुरू आहे. देशातील १२ विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले असून, एअर इंडियाही विकण्याच्या तयारीत सरकार आहे. तसेच, बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील कर्मचाऱ्यांना बळजबरी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले. रेल्वे आणि युद्धसामग्री बनवणारे कारखानेही हळूहळू खासगीकरणाच्या दिशेने जात आहेत. या सर्व गोष्टींचा विरोध या कामगार संघटना करत आहेत.

आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएच, सीआयटीयू, एआययूटीसी, टीयूसीसी, एसईडब्लूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी यांच्यासह अनेक कामगार संघटना या संपात सहभागी होतील.१७५ हून अधिक शेतकरी आणि कृषी कामगार संघटनांदेखील कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देणार आहेत.