पुण्यात आजारपणाला कंटाळून वृध्द पत्नीचा गळा चिरुन खून

0
442

पुणे, दि. २ (पीसीबी) – पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीचा गळा चिरुन खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी वानवडी परिसरातील फ्लॉवर व्हॅली लोटस बिल्डिंग सोसायटीतील फ्लॅट नंबर १०२ मधून समोर आली.

देविंदर कौर बिंद्रा (वय ६६) असे मयत महिलेचे नाव आहे. तर हरविंदर सिंग बिंद्रा (वय ७८) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी बाजार येथील फ्लॉवर व्हॅली लोटस बिल्डिंग सोसायटीमध्ये फ्लॅट नंबर १०२ मध्ये देविंदर कौर बिंद्रा आणि हरविंदर सिंग बिंद्रा हे दोघे पती, पत्नी राहत होते. पत्नी देविंदर कौर बिंद्रा या नेहमी आजारी असत. अखेर सततच्या आजारपणाला कंटाळून हरविंदर यांनी चाकूने गळा कापून पत्नी देविंदर कौर बिंद्राची खुन केला. त्यानंतर हरविंदर यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘देविंदर कौर सतत आजारी असल्याने सांभाळू शकत नाही. मी स्वतः तिची हत्या केली असून यासाठी अन्य कोणालाही जबाबदार धरू नये”, असे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. हरविंदर यांनी आपणही आत्महत्या करणार असल्याचे पुढे नमूद केले होते. पोलिस हरविंदर यांचा शोध घेत आहेत.