आगे मर्डर हुआ है, अकेले मत जाओ; सोनसाखळी चोरांचा नवा फंडा

0
229

पुनावळे, दि. ३ (पीसीबी) – ‘आगे मर्डर हुआ है, अकेले मत जाओ’ अशी थाप मारून दोन चोरट्यांनी वृद्ध महिलेकडील 64 हजारांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. 2) सायंकाळी पावणेसहा वाजता पुनावळे येथे घडली.

देवकी नरसिंग मेहता (वय 62, रा. पुनावळे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुनावळे येथील फरांदे सोसायटीसमोरून सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी चोरटे त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांना ‘आगे मर्डर हुआ है, अकेले मत जाओ’ अशी थाप मारली. त्यानंतर फिर्यादी यांच्या हातातील पाच ग्राम वजनाची अंगठी आणि 12 ग्राम वजनाची सोन्याची साखळी असा एकूण 64 हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.