असा नेता होणे नाही… – दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्या आठवणीत मोहन नगर गहिवरले

0
283

पिंपरी दि. १० (पीसीबी) – समाजकारण , राजकारणात सामान्य लोकांसाठी सतत तळमळीने काम करणारे गजानन बाबर हे एकमेव होते. असा नेता होणार नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

मोहननगर येथीलदत्तमंदिर चौकात
बुधवारी (दि.९) सायंकाळी बाबर यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक सभा आयोजित केली होती.

माजी खासदार गजानन (भाऊ) धरमशी बाबर यांचे अल्पशा आजाराने २ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यानिमित्त “शोकसभा” आयोजित करण्यात आली होती.
सतिश महाराज काळजे (आळंदी देवाची) यांच्या मधुर वाणीतून प्रवचनाला सुरवात करण्यात आली. स्वर्गीय गजानन बाबर यांच्या संपूर्ण जीवनपटावर व सांप्रदायिक विषयांची सांगड घालत एकत्रित आपले प्रवचन केले. यावेळी मोहन नगर गहिवरले.
पिंपरी चिंचवड कर्मचारी संघाचे अनिल राऊत यांनी, टपरी संघटनांपासून ते हीरे-मोती सोनार संघटनेचे अध्यक्ष राहणारे भाऊ हे हमेशा प्रवाहाच्या विरोधात कसे पोहायचे , सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहायचे, त्यांची कैफियत ऐकायचे, अशा बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला.
बिजलीनगर येथील जुने जाणते शिवसैनिक बबलू पाटील हे खास भाऊंच्या आठवणींना सांगण्यासाठी आले होते. निवडणुकीच्या वेळेस भाऊंच्या गाडीमध्ये फिरणे प्रचारामध्ये सहभाग घेणे भाऊंच्या घरच्या डब्यात जेवण करणे ” अशा विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

.मोहननगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे यांनी “भाऊं ३०-४० वर्ष मोहननगर परिसरात राहतात. त्यांचे समाजकारण ,राजकारण, सामान्य लोकांऩसाठीची तळमळ व त्यांच्याकडे बघून आम्ही पण समाजसेवेत कसे आलो” याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी ” त्यांच्या लहानपणापासून भाऊंच्या घरी टीव्ही बघणे , स्वर्गीय नेताजी चव्हाण यांच्यासोबत काही शिवसैनिकांना घेऊन मोहननगर शाखा स्थापन करण्यापासून ते हवेली मतदारसंघ आमदारकीचा प्रचार कसा कसा केला, जुन्या आठवणींना उजाळा दिला .
माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी ” “असा नेता पुन्हा होणे नाही
काळभोर नगरमध्ये अनेक वर्षांपासून किराणा माल दुकान चालवण्यापासून ते खासदार खासदारकीपर्यंतच्या प्रवासाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
मोहननगर येथील संग्राम पतसंस्थेच्या संचालकांनी पाठवलेला शोकसंदेश सूत्रांनी संचलन करणारे अक्षय मोरे यांनी वाचून दाखवला संपूर्ण संग्राम पतसंस्था संचालक व त्यांचे सभासद हे बाबर कुटूंबियांच्या दु खात सहभागी असून भाऊंच्या आत्म्यास शांती लाभो अशा शोकसंदेश दिला.
शिवसेना मोहननगरच्या नगरसेविका मिनल यादव यांनी माझे गुरू , वडिलांसमान ,राजकारणातिल गॉडफादर ,आधारवड हरपला. गेल्या काही महिन्यांपूर्वी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भेट झालेल्याच्या आठवणींना उजाळा दिला .
बाबर यांचे बंधू मधुकर शेठ बाबर यांनी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे तसेच आयोजक शिवसेना शाखा मोहननगर व विशाल यादव मित्रपरिवाराचे आभार मानले. कार्यक्रमाचा शेवट “पसायदान” म्हणून झाले.
सूत्रसंचलन श्री अक्षय मोरे यांनी केले.
राजू भाऊ कुऱ्हाडे ज्येष्ठ शिवसैनिक आनंदनगर दिलीप दातीर पाटील ,गणेश दातीर पाटील, शंकर वाडकर बाळासाहेब यादव, युवराज कोकाटे, शिवसेना विभागप्रमुख नाना काळभोर , विजय कुमार गुप्ता, भाई भोसले आदी उपस्थित होते.