अर्थसंकल्प: महिला उद्योजकांना १ लाख रुपयांचे कर्ज देणार

0
319

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी,शिक्षण, आरोग्य, जलशक्ती या क्षेत्रांसाठी काही महत्त्वपूर्ण तरतूदी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे महिलांसाठीही काही महत्त्वाच्या घोषणा सीतारामन यांनी फेब्रुवारी २०१९मध्ये पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काही विशेष निर्णय घेण्यात आले नव्हते. याउलट निर्मला सीतारमन यांच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी आश्वासक चित्र उभे करण्यात आले आहे. महिला सबलीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे.

या देशातील बहुसंख्य महिला आजही आर्थिकदृष्ट्या परावलंबी आहे. तेव्हा महिला सबलीकरणासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती महिलांचे प्रश्न, स्त्री-सक्षमीकरण,स्त्री-सबलीकरण या मुद्द्यांवर भर देईल अशी माहिती सीतारामन यांनी दिली आहे. आज देशातील प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे असेही सीतारामन यांनी यावेळी नमूद केले. मुद्रा योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना १ लाख रुपयांचे कर्ज देणार असल्याची घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच बचत गटांमध्ये , लघुउद्योगांमध्ये काम करणाऱ्या महिलांचीही दखल सीतारामन यांनी घेतली आहे.

महिला बचतगटांमध्ये, गृहउद्योगांमध्ये काम करणाऱ्या महिलांचे जनधन खाते असल्यास त्या खात्याला ५००० रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळणार आहे. या सुविधेअंतर्गत पात हजार रुपये लवकरच जनधन खात्यात जमा करण्यात येतील.

‘ ज्याप्रमाणे पक्ष्याला पंखांशिवाय उडता येत नाही त्याचप्रमाणे महिलांच्या सहभागाशिवाय देश पुढे जाणार नाही. तेव्हा महिलांचे आर्थिक विकासातील योगदान वाढावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे’ असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.