अर्णब गोस्वामीच्या मोबाईल संवादाच्या रेकॉर्डवरून अनेक गौप्यस्फोट

0
258

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – रिपब्लिक टिव्हीचे वादग्रस्त संपादक अर्णब गोस्वामी यांच्या मोबाईल संवादाचे सुमारे ५०० पानांचे रेकॉर्ड मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सुपूर्द केले असून त्यातून अनेक मोठ्या प्रकरणांचे गूढ उकलले आहे. राजकीय घडामोडींवर लख्ख प्रकाश टाकणारे काही गौप्यस्फोट झाले असून त्यामुळे आता भाजपाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. तीन विविध स्क्रीनशॉट मध्ये ज्या महत्वाच्या प्रकरणावर गोस्वामी यांनी केलेला संवाद आम्ही देत आहोत.

१ ला स्क्रीनशॉट – अरुण जेटलींना सक्तीची निवृत्ती
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मध्ये अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आणि मोदी त्यांचं मन वळवण्यासाठी त्यांच्या घरी गेले तरीही मंत्रिपद स्वीकारलं नाही, अशा बातम्या झळकल्या होत्या. पण खरं पडद्यामागे काय घडलं ते अर्णब गोस्वामीच्या चॅट मधून उघड झाले. जेटलींच्या कारभारावर नाराज होऊन त्यांना जबरदस्तीने मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं. आणि मोदी जेटलींच मन वळवण्यासाठी गेले हा तर केवळ एक फॉर्मालिटी स्टंट होता. याशिवाय AS should be Home or Party President या वाक्यावरून AS म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून अमित शाह च आहेत हे अधिकृतपणे सिध्द होतंय. त्यामुळं ज्या मोजक्या लोकांना याबद्दल शंका होती किंवा जे AS initials असलेल्या वेगवेगळ्या लोकांच्या नावांचे तर्क लावत बसले होते त्यांची शंका आपोआप दूर होईल.

२ रा स्क्रीनशॉट – सिग्नल ऍपवर संवाद
या संभाषणात ८ जून २०१९ मध्येच पार्थो दासगुप्ता ने अर्णबला सिग्नल ऍप डाऊनलोड करायला सांगितलं होतं. त्याच्यावरून केलेले कॉल सेफ असतात असं त्याचं म्हणणं होतं. अर्णब ने त्याला सिग्नल ऍप डाऊनलोड करत आहे असं ही सांगितलं. आपण आज २०२१ मध्ये ह्या ऍप बद्दल पहिल्यांदा ऐकतोय आणि या लोकांना २०१९ मध्येच त्या बद्दल माहिती होती. अनेक सिक्रेट कॉल संभाषण त्या ऍप वरून केलं असण्याची शक्यता आहे.

३ रा स्क्रीनशॉट –
बहुतेक हे रजत शर्मा विषयी संभाषण आहे. अनुराग ठाकूर कडे दोन बिझनेसमेन ना घेऊन गेला होता डील करण्यासाठी त्यावेळी त्याला ४५ मिनिट वाट पाहायला लावली. कसली डील करत होते अनुराग ठाकूर आणि रजत शर्मा सोबतचे बिझनेसमेन? #भाबडाप्रश्न