अरुणगंध हा गौरवग्रंथ नव्या पिढीला निश्चितपणे प्रेरक ठरेल : शरद पवार

0
228

बारामती, दि. ४ (पीसीबी) : कामगार नेते श्री अरुण बोऱ्हाडे यांच्या सामाजिक, राजकीय, कामगार क्षेत्रातील कार्याचा आढावा घेणारा “अरुणगंध” या गौरवग्रंथाचे प्रकाशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री श्री शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.

कामगार चळवळीत काम करीत असताना, कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करतानाच साहित्य, सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रातही त्यांनी केलेले काम हे वैशिष्टयपूर्ण आहे. विविध क्षेत्रातील सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याची नोंद घेऊन केलेला हा अरुणगंध हा गौरवग्रंथ नव्या पिढीला निश्चितपणे प्रेरक ठरेल, असा मला विश्वास आहे. असे उद्गार यावेळी बोलताना मा. शरद पवार यांनी काढले.

बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, माजी महापौर आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, गिर्यारोहक श्रीहरी तापकीर, सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे, कामगार नेते माणिक सस्ते, योगेश कोंढाळकर, गौरवग्रंथाचे संपादक संदीप तापकीर, सोशल मिडिया अध्यक्ष समीर थोपटे इत्यादी उपस्थित होते.