अभिनेत्री अमिषा पटेल अडचणीत; २.५  कोटींचा गैरव्यवहार केल्याचा निर्मात्याचा आरोप

0
331

मुंबई , दि. ३० (पीसीबी) – बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यावर  चित्रपट निर्माते अजय सिंह यांनी   २.५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा  आरोप केला आहे.  या प्रकरणी  त्यांनी अमिषाविरोधात रांची न्यायालयात  खटला दाखल केला आहे.

गेल्या वर्षी ‘देसी मॅजिक’ नामक चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अमिषाने त्यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. पण, आता मात्र ती या पैशांचा विषयच काढत नव्हती. या संपूर्ण आर्थिक व्यवहाराप्रकरणी अमिषाला न्यायालय़ाकडून समन्स बजावण्यात आले आहे. ज्याअंतर्गत तिने ८ जुलै या तारखेपूर्वी न्यायालयापुढे हजर राहणे अपेक्षित आहे. अमिषा न्यायालयात हजर राहिली नाहीस, तर तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात येईल, अशी माहितीही सिंह यांनी दिली.

२०१७ मध्ये सदर निर्माते आणि अमिषाची भेट झाली होती. त्याचवेळी त्यांच्यामध्ये एका चित्रपटाची चर्चा झाली. या चित्रपटाचं त्यावेळी चित्रीकरण सुरूच होतं. काही भागाचं चित्रीकरण पूर्ण होतं, तर काही भाग आर्थिक अडचणींमुळे रेंगाळला होता. ज्यामुळेच सिंह यांनी चित्रपटात २.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.