अबब…३१ ऑगस्ट पर्यंत पुणे तब्बल १.६० लाखावर पोहचणार

0
265

पुणे, दि. ११ (पीसीबी) – राज्या सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ३१ ऑगस्ट पर्यंत पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून १ लाख ६० हजार २०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतील. त्यापैकी ६२ हजार २६८ हे सक्रीय रुग्ण असतील अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी चिंचवड शहरातील जंबो फॅसिलीटी दोन दिवसांत उफलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना परिस्थितीचा आढावा आणि शासन स्तरावर केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पिंपरी चिंचवड महापावलिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे उपस्थित होते.
राव म्हणाले, गेल्या दहा दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज सरासरी इतकीच आहे, त्यात वाढ झालेली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. कोरोनाची परिस्थितीती तशी आटोक्यात आहे. मुंबई, ठाणे शहराशी तुलना करता कोरोना दुपटीचा वेग आता नियंत्रणात आला आहे. पुणे शहरात तो ३५ दिवसांवर आला आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वी १२-१३ दिवस होता तो आता २१ दिवस झाला आहे. ग्रामिण भागात तो १९.५ दिवस आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे १ ऑगस्टला ३९ टक्के होते, ते नंतर कमी होत होत २१ टक्के पर्यंत आला खाली आले आहे. आयसीएमआर च्या गाईडलाऊन नुसार ते १० टक्के असायला पाहिजे. कोरोना चाचणी बाबत पुणे राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात सरासरी ५३० चाचण्या होतात, मुंबईत ५४६ तर पुणे जिल्ह्यात त्या ८५६ पर्यंत होतात.
पिंपरी चिंचवडची आघाडी –
पिंपरी चिंचवड शहरातील जंबो फॅसिलीटी बाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, अण्णासाहेब मगर स्टेडियमवर २०० आयसीयु आणि ६१६ ऑक्सिजनेटेड बेडची सुविधा निर्माण करण्याचे काम वेगात सुरू आहे. ऑटो क्लस्टर येथे ५० आयसीयु आणि १५० ऑक्सिजनेटेड बेडचे काम तीन दिवसांत पूर्ण होईल. त्याशिवाय बालनगरी येथील सुविधाही पूर्ण झाली असून दोन दिवसांत खुली होईल.
जंबो फ्रसिलीटीसाठी सहा महिन्यांचा खर्च ९० कोटी –
जंब फॅसिलीटी सेवा देण्यासाठी रितसर समिती नियुक्त केली होती. त्यात १६ जणांनी सहभाग घेतला होता, प्रत्यक्षात ५ जणांननी निविदा भरल्या. पुणे शहराचे काम दीपाली एन्टरप्रायझेस या दिल्लीच्या संस्थेला दिले, तर मुंबई महापालिका आणि एमएमआरडीए यांच्याबरोबर काम करणाऱ्या मुंबईतील जेएसएस कंपनीला पिंपरी चिंचवडमध्ये काम दिले आहे. या सेवेसाठी सहा महिन्यांचा सरासरी खर्च ८६ ते ९० कोटी रुपये आहे. त्यात राज्य सरकार ५० टक्के पुणे महापालिका २५ टक्के, पिंपरी चिंचवड १५ टक्के आणि उर्वरीत पीएमआऱडीए कडून मिळणार आहेत.

खासगी रुग्णालयांचे बिल तपासणीसाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. आता बिलापूर्वीच (प्रिऑडिट) करण्याचे काम सुरू आहे. एक तासात हे ऑडिट होईल. अधिक बिल घेणाऱ्या रुग्णालयांबाबत आजवर ८३ तक्रारी आल्या असून सर्वांना नोटीस दिली आहे. ११ जणांनी त्याचे उत्तर दिले आहे, अशी माहिती राव यांनी दिली.