अबबब…कोरोनावर मात करायला आणखी किती कालावधी

0
282

जीनिव्हा, दि. २३ (पीसीबी)  : कोरोनामुळे जग त्रस्त आहे, केव्हा एकदाची ही ब्याद जाते असे सर्वांना झाले आहे. अशातच आता आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  कोरोना साथीवर मात करण्यास किमान दोन वर्षे लागू शकतात, त्यासाठी लशीसह उपलब्ध सर्व साधनांचा वापर करावा लागेल, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते साधारण दोन वर्षांचा कालावधी करोनाची साथ संपवण्यास लागणार असला तरी तो १९१८ मधील स्पॅनिश फ्लूची साथ घालवण्यास लागलेल्या काळापेक्षा कमीच म्हणता येईल. दरम्यान, जगभरात २२.८५ दशलक्ष लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून आठ लाख लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. १९ लाख लोक करोनातून बरे झाले आहेत.

दक्षिण अमेरिकेतील रुग्णांची संख्या सहा लाखांवर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेत सहा लाख रुग्ण असून १२,८४३ बळी गेले आहेत. ब्रिटनने फ्रान्समधून येणाऱ्या लोकांना स्वप्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. स्पेन, नेदरलँड्स, बेल्जियम, क्रोशिया, ऑस्ट्रिया या देशांतील लोकांना विलगीकरणाच्या यादीत टाकण्यात आले आहे.

’ ब्राझीलमध्ये ३०,३५५ नवे रुग्ण सापडले असून, शुक्रवारी १०५४ जणांचा मृत्यू झाला. तेथील एकूण रुग्णसंख्या ३५,३२,३३० वर पोहोचली आहे. मृतांची संख्या १ लाख १३ हजार ३५८ झाली असून, अमेरिकेनंतर करोनाबळीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे.

’ स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी करोना प्रतिबंधासाठी फारशी कठोर धोरणे न राबवल्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. स्वीडनने इतर युरोपीय देशांसारखे कडक निर्बंध लागू केले नव्हते. स्वीडनमधील मृतांची संख्या नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क यांच्यापेक्षा अधिक आहे.

अमेरिकेत मॉडर्ना लशीच्या चाचणीसाठी १३,१९४ स्वयंसेवकांनी नावे नोंदवली आहेत. तीस हजार जणांची चाचणी करणे आवश्यक आहे. मॉडर्नाची ‘एमआरएनए १२७३’ लस चाचणीच्या पातळीवर आहे. सप्टेंबपर्यंत चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी पूर्ण होईल. दरम्यान, अमेरिकेने मेक्सिको सीमेवरील रस्ते बंद केले असून करोनाकाळात ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरावर निर्बंध घातले आहेत.

भारताने २९,७५,७०२ कोरोना रुग्णांचा आकडा गाठला आहे. त्यात रिकव्हरी २२,२२,५७७ पर्यंत गेली आहे, तर ६,९७,३३० सक्रीय रुग्णांची संख्या आहे. मृतांची संख्या ५५,७९४ पर्यंत आहे. रोज सरासरी ६५ हजार रुग्णांची भर पडते आहे.