अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
291

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – महापालिकेची परवानगी घेतल्याशिवाय बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेकडून बांधकाम मालकांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपाली किरण देशमुख, किरण चंद्रकांत देशमुख (दोघे रा. स्वराज हाऊसिंग सोसायटी, बो-हाडेवाडी, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडून सूर्यकांत शिवाजीराव मोहिते यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या घराचे बांधकाम महापालिकेची परवानगी घेतल्याशिवाय केले. त्याबाबत महापालिकेकडून त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली. मात्र, त्यावर कोणतीही अंमलबजावणी न करता आरोपींनी अनधिकृत बांधकाम काढले नाही. याबाबत त्यांच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.