अनधिकृतपणे जाहिरात लावल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

0
653

थेरगाव, दि. २६ (पीसीबी) – महापालिकेच्या सार्वजनिक जागेत अनधिकृतपणे जाहिरात लावल्या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. २५) सकाळी गुजरनगर उड्डाणपूल, थेरगाव येथे घडला.

प्रमोद अमोल पारसुकर, साक्षी लोखंडे (रा. कुंदननगर, कासारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सुरेश भवरलाल चन्नाल यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरनगर उड्डाणपूल, थेरगाव येथे आरोपींनी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात लावली. जाहिरात लावून आरोपींनी उड्डाणपुलाचे विदृपण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सार्वजनिक मालमत्तेचे विरूपणास प्रतिबंध कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.