अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
249

पुणे, दि. २७ (पीसीबी) – अज्ञात वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.25) सकाळी साडेसातच्या सुमारास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ चौकात घडला.

याप्रकरणी सुनिलकुमार राजाराम अय्यर (वय 21 रा. महाळुंगे) यांमी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात तिरथ अय्यर (वय 20 रा.महाळुंगे )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मेहुण्याचा भाऊ तिरथ हा चौकातून फिर्यादीसह अल्ट्राटेक कंपनी येथे जात होता. यावेळी अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली ात तिरथ अय्यर हा गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.