अजित पवार यांच्याविरोधात भाजपकडून गोपीचंद पडळकर रिंगणात ?

0
527

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात भाजपकडून गोपीचंद पडळकर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पडळकर मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  

बारामती पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. बारामतीत गेली पाच दशके पवार कुटुंबाची सत्ता आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून १९६७ ते १९९० पर्यंत सहावेळा शरद पवार आमदार होते. त्यानंतर १९९१ ची पोटनिवडणूक आणि त्यानंतर १९९९ ते २०१४ पर्यंत अजित पवार या मतदारसंघातून विजयी होत आहेत.

अजित पवारांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे पडळकरांचा येथे निभाव लागणे कठीण आहे. पडळकरांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढली तरी बारातमीत पवार कुटुबियांना मानणारा मोठा वर्ग आहे.