अखेर शिवसेना एनडीए मधून बाहेर; भाजपाकडून अधिकृत घोषणा

0
586

नवी दिल्ली,दि.१७(पीसीबी) – शिवसेना अखेर एनडीएमधून अधिकृतरित्या बाहेर पडली आहे. भाजपकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबतची माहिती दिली.

सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही घोषणा केली.विरोधी पक्षात असल्याने आता शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतील आसन व्यवस्थेतही बदल होणार आहे. आज होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे शिवसेनेने आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये राज्यात असले तरी आता राष्ट्रीय पातळीवरही दिसणार आहे.शिवसेना आता सरकारचा नाही तर विरोधी पक्षाचा भाग असेल, अशीही घोषणा भाजपने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी एनडीएची बैठक बोलवली होती मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच आजच्या बैठकीला शिवसेनेचे खासदार जाणार नसल्याची माहिती दिली होती.प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की शिवसेनेच्या मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही शिवसेनेचे खासदार उपस्थित नाहीत त्यामुळे सरकारचा भाग नसल्याने त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे.