अक्षय तृतियाच्या शुभ मुहूर्तावर श्रीतुळजा भवानी मातेस शिव कालीन दागिने घालण्यात आले

0
540

 

तुळजापूर, दि.२६ (पीसीबी) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेस आज रविवारी अक्षय तृतियाच्या शुभ मुहूर्तावर श्रीतुळजा भवानी मातेस शिव कालीन दागिने घालण्यात आले.

प्रारंभी पहाटे श्री देवीचे चरणतीर्थ होऊन सकाळी ६ वाजता श्री देवीजीस पंचामृत दुग्धाभीषेक घालून श्री तुळजा भवानी मातेस वस्ञोअलंकार चढवून छञपती शिवाजी महाराजांनी दिलेले मौल्यवान दागिने घातले. श्री देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली.

या वर्षी प्रथमच कोरोना विषाणू या साथीच्या रोगामुळे श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात भक्ताविना सन्नाटा पसरला होता. त्याचबरोबर तीर्थक्षेञ तुळजापुरात कोरोना व्हायरसमुळे सन्नाटा पसरला होता. कोरोना व्हायरसमुळे शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात सन्नाटा पसरला आहे.

या वेळी मुख्य भोपे पुजारी शिवाजी परमेश्वर, श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा पाळीकर , पुजारी धनंजय कदम, शहाजी भांजी, श्री तुळजा भवानी मातेचे सेवेदार दुर्गेश छञे,चोपदार,पलंगे पोहेकर आदीसह सेवेदार उपस्थित होते.