समिता गोरे यांची काँग्रेसच्या युवक व क्रीडा विभाग प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती

0
233

काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..!

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समिता राजेंद्र गोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत युवक व क्रीडा सेलच्या प्रदेश अध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी समिता गोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा दिल्या.

समिता गोरे या गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड व पुणे परिसरामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य करत आहेत, महिला भगिनींना तसेच तरुणांना रोजगार प्रशिक्षण देऊन व्यवसायात संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत, त्यातच त्या स्वतः राष्ट्रीय खेळाडू व पिस्टल शूटिंग प्रशिक्षक आहेत, आहार विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, त्यांचा जनसंपर्क मोठा असून सर्वसामान्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी त्या कार्यरत आहेत, कोरोनाकाळातही त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले.

समिता गोरे यांच्या काँग्रेस युवक व क्रीडा विभाग प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातही काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, त्याचबरोबर समिता गोरे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नियुक्तीबद्दल शुभेच्छा देण्यात येत आहेत.