विजयादशमी निमित्त आळंदी रोडच्या साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

83

-माध्यन्ह आरती जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णदेव नंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार

पिंपरी, दि. 4( पीसीबी) – विजयादशमी आणि श्री साईबाबा यांची पुण्यतिथी निमित्त आळंदी रोड येथील साई मंदिरामध्ये मंगळवार ते गुरुवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा मंदिर, वडमुखवाडी, आळंदी रोड पुणे चे विश्वस्त, अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.मागील दोन वर्ष कोरोनामुळे मंदिरात मोठे उत्सव साजरे करण्यात आले नाही. यावर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.

यावर्षी बुधवारी विजयादशमीच्या निमित्त बुधवारी श्री साईबाबा यांची माध्यान्ह आरती अनंत विभूषित धर्म सम्राट जगद्गुरु सूर्या चार्य कृष्णदेव नंद गिरीजी महाराज. पिठाधीश्वर, सूर्यपिठ, मुरली मंदिर, जुना आखाडा, द्वारका, गुजरात यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.मंगळवारी ( दि. ४) पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनईवादन, मंगल स्नान, साईबाबांचे छायाचित्र आणि पोथीची मिरवणूक, द्वारका माईतील साईचरित्र अखंड प्रारंभ, साईबाबांची पाद्यपूजा, सकाळ ७ वाजता ची श्रींची आरती तसेच दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती सायंकाळी ७ वाजता धुपारती, सायंकाळी ७:३० वाजता साई भजन माला, रात्री १० वाजता शेजारती, गुरुवारी रात्रभर अखंड पारायणासाठी द्वारकामाई खुले राहील.

बुधवारी (दि.५) विजयादशमीच्या दिवशी पहाटे ५ वाजता काकड आरती, मंगल स्नान ,साई चरित्र अखंड पारायण सांगता सोहळा, ६ वाजता साईबाबांचे छायाचित्र व पोथीची मिरवणूक त्यानंतर साईबाबांची पाद्यपूजा, सकाळची आरती ७ वाजता, रुद्राभिषेक श्री साई भिक्षाझोळी, दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती, २ वाजता दीपज्योत, नामस्मरण यानंतर प्राणज्योत निर्यान प्रार्थना, साईबाबा भजन व फुलांचा अभिषेक, राम मंदिर येथे सिमोल्लंघन संध्याकाळी ५ वाजता नंतर श्रींची पालखी, धुपारती व हरिजागर रात्री अकरा वाजता.

गुरुवारी सांगता समारोप दिवशी पहाटे ५:३० वाजता मंगल स्नान, त्यानंतर साईबाबांची पाद्यपूजा, सकाळी ७ वाजता श्रींची आरती, गुरुस्थान येथे रुद्राभिषेक, सकाळी ११ वाजता गोपाळकाला, दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती, संध्याकाळी ७ वाजता धुपारती, संध्याकाळी ७:३० वाजता साई भजन माला आणि रात्री १० वाजता श्रींची शेजारती होईल. उत्सवानिमित्त बुधवारी आणि गुरुवारी मंदिर रात्रभर भाविकांना परायानासाठी, दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे अशीही माहिती अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली आहे.