रिपाई पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी कुणाल वाव्हळकर

0
178

रिपाईच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी युवक कार्यकर्ते कुणाल वैजनाथ वाव्हळकर यांची एक वर्षांसाठी हंगामी नियुक्ती कऱण्यात आली आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर वारभुवन आणि वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख यांच्या समन्वय समितीच्या बैठकित कुणाल वाव्हळकर यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

शहरात रिपाईचे युवक अध्यक्ष म्हणून गेल्या सात वर्षांपासून कुणाल वाव्हळकर हे कार्यरत आहेत. भीमा कोरेगाव येथील आंदोलन, प्राधिकरणातील रिंग रोड बाधित नागरिकांच्या तसेच प्राधिकरणग्रस्त मूळ भूमिपुत्रांच्या साडेबारा टक्के परतावा आंदोलनात त्यांचा सहभाग होता.