महिला दुकानदाराला मारहाण करणा-यास अटक

146

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – मी इथला भाई आहे म्हणत महिला दुकानदाराला हप्त्यासाठी मारहाण करणाऱ्या तथाकथीत भाईला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.7) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास भोसरीतील लांडेवाडी जवळ घडला.

रुपेश सुरेश पाटील (वय30 रा.मोरोवस्ती, चिखली) असे अटक आरोपीचे नाव असून सोमवारी तक्रारीवरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेला विनाकारण मारहाण करत आरोपीने हप्त्याची मागणी केली.यावेळी महिलेने तू मला का मारहाण करत आहेस व काल तू माझ्या दाजीलाही का मारले अशी विचारणा केली असाता, आरोपीने मी इथला भाई आहे. मी रोज असे कोणालाही मारतो तसे तुझ्या दाजीला मारले. तूला ही धंदा करायचा असेल तर मला महिन्याला हप्ता द्यावा लागेल. नाही तर तूला व तुझ्या दाजींना जिवंत सोडणार नाही म्हणत महिलेला कोयत्याचा धाक दाखविला.तसेच महिलेच्या पर्समधून 7 हजार रुपये काढून नेले. हप्याता चालू कर नाहीतर तुला भोसरीत धंदा करु देणार नाही अशी धमकी दिली. यावरून भोसरी पोलिसांनी रुपेशला अटक करत त्याच्यावर खंडणी, मारहाण, विनयभंगाचा तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.