महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय राज्यातील नवीन सरकारने का रद्द केले ?

22

मुंबई, दि. ४ (पीसीबी) महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय राज्यातील नवीन सरकारने का रद्द केले ,असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. राज्यातील नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाविकास आघाडीसरकाने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने शिंदे सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने रद्द केले असून यामुळे घटनेच्या अनुच्छेद 164 कलम 1(अ) चे उल्लंघन केल्याचा आरोप करत किशोर गजभिये यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज जस्टिस गंगापूरवाला यांच्या खंडपीठाने सुनावणी केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून खुलासा मागवला आहे.