महापालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात गुरुवारी आप चा मोर्चा.

0
255

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड च्या वतीने 24 नोव्हेंबर 2022 गुरुवारी दुपारी अडीच वाजल्यापासून मोरवाडी न्यायालयापासून ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका भावना पर्यंत जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशातील प्रमुख पैकी एक श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. परंतू खेदाने बोलावे लागत आहे की ह्याच महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. २५ लाख पेक्षा जास्त जनतेचे प्रतिनिधित्व करणारी आणि ७ हजार कोटींचे वार्षिक बजेट असणारी आपली ही श्रीमंत महानगरपालिका आजी-माजी कारभाऱ्यांच्या गलथान कारभारांमुळे आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सेवाही सर्व सामान्य जनतेला तीच्या कराच्या बदल्यात देऊ शकत नाही.

कारण कारभारी बदलले तरी कारभार सुधारत नाही हे आधीच्या राष्ट्रवादीच्या आणि गेल्या पाच वर्षांतील भाजपाच्या भ्रष्ट कार्यकाळात आपण आम आदमी जनतेने उघड्या डोळ्यांनी निराश होऊन पाहिलेले आहेच. पण आत्ता हे असे किती दिवस चालणार? म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य नागरिकांचा हक्क आणि आवाज टक्केवारीने पोखरलेल्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाऱ्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी आणि आम जनतेची राजकीय जागृती करण्यासाठी तुम्हास या पत्रकाद्वारे आम्ही आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड च्या वतीने या जन आक्रोश मोर्चा मध्ये तुमच्या कुटूंब-मित्रपरिवारांसह सामील होण्यासाठी नम्र विनंती करीत आहोत.