भोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले

52

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – दुचाकीवरून घरी जात असलेल्या तरुणाला तिघांनी मिळून मारहाण करून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री साडेबारा वाजता खडी मशीन चौक येथे घडली.

दाऊत जैलुद्दिन शेख (वय 28, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे आरटीओ एजंट आहेत. गुरुवारी मध्यरात्री ते दुचाकीवरून घरी जात होते. खडी मशीन चौकात आल्यानंतर एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शेख यांना अडवले. त्यांना हाताने मारहाण करून त्याच्या खिशातून नऊ हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर फिर्यादीकडील कस्टमरची कागदपत्रे असलेली बॅग चोरट्यांनी जबरदस्तीने काढून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.