भरधाव डंपरची सायकलला धडक; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

0
333

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- भरधाव डंपरने एका सायकलला धडक दिली. त्यात सायकलवरून जाणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी दहा वाजताच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली.

धीरज प्रदीप निकम (वय 16, रा. पंचनगर कॉलनी, जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी डंपर चालक ज्ञानदेव गोपाळ पवार (वय 55) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी प्रदीप अशोक निकम (वय 42, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. जळगाव) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज निकम हा दहावीत शिक्षण घेतो. तो मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सायकलवरून जात होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या डंपरने (एमएच 14/एचएम 6667) धीरजच्या सायकलला धडक दिली. या धडकेत धीरज गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.