भरधाव डंपरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
81

दि 3 एप्रिल (पीसीबी )- भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बिकानेर स्वीटहोम चौक, भोसरी येथे घडली.

सोनाजी बबन मोहिते (वय २७, रा. लोणीकंद) याला याप्रकरणी अटक केली आहे. मयूर रघुनाथ भावसार (वय ४१, रा. पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. आकाश रघुनाथ भावसार (वय ४२, रा. वाकड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ मयूर भावसार हे त्यांच्या दुचाकीवरून भोसरी येथून जात होते. बिकानेर स्वीट होम चौक येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिली. त्यामध्ये मयूर हे रस्त्यावर पडले. डंपर चालकाने मयूर यांच्या अंगावरून डंपर घातला. त्यात मयूर यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.