भरधाव कारच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

0
413

मोशी, दि. २२ (पीसीबी) – भरधाव कारच्या धडकेत रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 19) रात्री आठ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर नागेश्वर शाळेजवळ मोशी येथे घडला.

मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. याप्रकरणी कार चालक आरिफ अब्दुल रहेमान तांबोळी (वय 50, रा. कोंढवा, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक फौजदार दीपक रणसोर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरिफ याने त्याच्या ताब्यातील कार (एमएच 12/एफवाय 6443) भरधाव चालवून मोशी येथील नागेश्वर विद्यालयाजवळ रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.