पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणासाठी महायुती सरकारने दिला निधी – खासदार बारणे

0
76

लोणावळा, दि. 10 (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारने 2,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पुणे लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागला आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-आरपीआय-रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज दिली.

खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळा येथे महायुतीच्या घटक पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. बैठकीस लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माझी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, युवा सेना प्रमुख विवेक भांगरे, महिला आघाडी प्रमुख मनीषा भांगरे, मुस्लिम बँकेचे संचालक जाकीर खलिफा, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कमलसिंग म्हस्के, माजी नगरसेवक देविदास कडू, तसेच सुनील हागवणे, राम सावंत दत्ता चोरगे, विशाल हुलावळे, सुधाताई सोमण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी लोणावळा परिसर व मावळ तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांची माहिती यावेळी दिली. पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील सरकारच्या नाकर्तेपणामुळे रखडले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अडीच हजार कोटी रुपयांचा राज्याचा वाटा मंजूर करून तो विषय मार्गी लावला. लोणावळा कर्जत मार्गाचे कामही होत आहे. लोणावळ्यासह रेल्वे स्थानकांचा विकास देखील झपाट्याने सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्ला येथील एकविरा देवस्थानला तीर्थविकास प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे. लोणावळा, खंडाळा, माथेरान पर्यटन स्थळ विकासासाठी 250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मावळ्यातील 100 पेक्षा जास्त गावात खासदार म्हणून आपण विकास निधी दिला आहे. शहरी भागात देखील विकास निधी कमी पडू दिलेला नाही. केवळ दलित वस्त्यांना साडेसात कोटी रुपये निधी दिला आहे. इंद्रायणी सुधार योजनेसह विविध कामे मार्गी लावली आहेत, असे त्यांनी सांगितले.

विरोधकांनी कोणताही विकास केलेला नसल्यामुळे त्यांना विकासावर बोलता येत नाही. त्यामुळे केवळ टीकेसाठी टीका करतात, असा आरोप बारणे यांनी केला.

सुरेखा जाधव, सूर्यकांत वाघमारे, अरुण लाड विलास बडेकर, कमलसिंग म्हस्के आदींची यावेळी भाषणे झाली. लोणावळा शहरातून खासदार बारणे यांना 25 हजारांहून अधिक मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. संजय भोईर यांनी सूत्रसंचालन केले.

लोणावळ्यातील विविध संस्थांना खासदार बारणे यांनी यावेळी शुभेच्छा भेट दिली. बांगरवाडी येथील भरत अग्रवल नागरी सहकारी पतसंस्थेत
अध्यक्ष श्रीमती लता भरत आगरवाल, उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेत उपाध्यक्ष कांताराम दळवी व अन्य पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांना शुभेच्छा दिल्या. गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा येथे जगदीश सलुजा, जंगबहादूर बक्षी, कुलदीप सेठी, दमन आनंद, नन्ना सहगल यांनी बारणे यांचा सत्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूललाही त्यांनी सदिच्छा भेट दिली.

लोणावळ्याचे ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थान येथे जाऊन खासदार बारणे यांनी दर्शन घेतले. त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष अमित गवळी, विश्वस्त संतोषी शिंदे, राष्ट्रवादीचे विलास बडेकर, नवनाथ हारपुडे, सुनील हारपुडे, प्रकाश हारपुडे, भरत हारपुडे यांनी खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. अमित गवळी यांच्या निवासस्थानी तसेच नितीन कुलस्वामिनी महिला मंचच्या मोफत शिवण क्लासला देखील बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. गवळीवाडा येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरास भेट देऊन खासदार बारणे यांनी दर्शन घेतले.

लोणावळा जेष्ठ नागरिक संघाच्या तिसाव्या वर्धापन दिन सोहळ्यास भेट देऊन बारणे यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, उपाध्यक्ष मृदुला पाटील, सुशीला गावडे, कार्यवाह रश्मी शिरसकर आदी पदाधिकाऱ्यांनी बारणे यांचे स्वागत व सत्कार केला.

खासदार बारणे यांनी हॉटेल चंद्रलोकला सदिच्छा भेट दिली. त्या ठिकाणी वुमन फाउंडेशनच्या ब्रिंदा अनिश गणात्रा व उद्योजक अनिश गणात्रा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी देशातील सध्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास यावेळी गणात्रा यांनी व्यक्त केला.

दर्गाह शरीफ हजरत कासिम शहावली रहै अर्थात सुन्नी मुस्लिम जमातीच्या वतीने जीशानभाई शेख यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले. त्यावेळी शफी अत्तार, रफिक चेअरमन, फिरोज बागवान, सलीम म्हात्रे, समीर सय्यद, अलीम शेख, नवाज शेख आधी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

जुना खंडाळा भागातील श्री सोमनाथ मित्र मंडळ श्री महादेव मंदिर येथे जाऊन खासदार बारणे यांना दर्शन घेतले. मग त्यावेळी माजी नगरसेविका अंजली कडू, भाजपचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव टकले, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सायली बोत्रे तसेच जितेंद्र बोत्रे, चंद्रशेखर भोसले चऱ्होलीकर आधी पदाधिकारी उपस्थित होते