पीएमटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
58

भोसरी, दि. २० (पीसीबी) – पीएमटीच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात मंगळवारी (दि.19) लांडेवाडी, भोसरी येथे घडला आहे.

याप्रकरणी ताजउद्दीन निजामुद्दीन अन्सारी (वय 46 रा.भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून बस चालक सोमेश्वर काशिनाथ शिंदे (वय 23 रा.भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात बद्रुद्दिन निजामुद्दिन अन्सारी (वय 49 ) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ बद्रुद्दिन अन्सारी हे दुचाकीवरून जात होते. यावेळी भोसरी येथील लांडेवाडी येथे असताना आरोपीने त्याच्याताह्यातील बस बेदरकारपणे चालवून अन्सारी यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात न्सारी गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला,यावरून भेसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत,