पावणे दोन लाखांनी जिंकणार – संजोग वाघेरेंचा दावा

0
190

मावळ लोकसभा मतदारसंघातून आपणच जिंकणार असल्याचा दावा महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे. प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणे यांना कोणत्या मतदारसंघात लीड मिळेल यांचाही अंदाज वाघेरे यांनी त्यांच्या पध्दतीने केला आहे. मावळ लोकावेसभेत 1 लाख 72 हजार 704 मतांनी विजय होईल, असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

वाघोरे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्याचा लेखाजोखा मांडला आहे. यामध्ये सलग दोनवेळा खासदार झालेल्या श्रीरंग बारणेंना फक्त पनवेलमधून लीड मिळेल, असा दावा वाघेरे यांनी केला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये बारणे यांना पनवेल सह चिंचवड, पिंपरी, मावळ आणि कर्जतमधून मोठे मताधिक्य मिळाले होते. यावेळी पनवेल वगळता सर्वत्र आपल्याला मोठे मताधिक्य किती मिळणार याचे गणित वाघेरे यांनी मांडले आहे. त्यात कर्जतमधून १८ हजार ९८५, उरण – ५५ हजार ६८२, मावळ – ५३ हजार ८०५, चिंचवड – १२ हजार ९०९ आणि पिंपरी – ४९ हजार ८२ असे मताधिक्य मिळेल असा दावा वाघेरे यांनी केला आहे.

पनवेल आणि चिंचवड हे दोन्ही शहरी मतदारसंघ सतत भाजपच्या मागे ठामपणे उभे असतात मात्र यावेळी चित्र वेगळे असेल असे वाघेरे यांचे मत आहे.
• सहा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे आमदार असूनही आपल्यालाच मताधिक्य मिळेल, असे संजोग वाघेरे ठामपणे सांगतात. बारणे यांनी दहा वर्षांत कामे केली नाहीत म्हणून नाराज असलेला मतदार आपल्या मागे आहे. तळेगाव येथून वेदांत फॉक्सकॉन सारखा प्रकल्प गुजराथला गेला तेव्हा खासदार शांत राहिले म्हणून बेरोजगार मतदारांत नाराजी आहे त्याचाही मोठा फायदा संभवतो, असे वाघेरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
आजवर गेल्या दहा-पंधरा वर्षांत बारणे हे अवैध बांधकामांच्या विषयावर मोठे झाले पण त्यांनी तो प्रश्न सोडविला नाही. शहरातील पाणी प्रश्नाची तीव्रता ओळखून त्यांनी प्रशासनाला नियोजनासाठी भाग पाडले पाहिजे होते, पण तिथेही लक्ष दिले नाही. छोटे मोठे अन्क विषय आहेत की जिथे बारणे यांचे बिलकूल लक्ष नव्हते म्हणुन त्या नाराजीचा फायदा मला होईल, असा युक्तीवाद वाघेरे यांनी केला आहे. मावळला कोणत्या मतदारसंघात किती मतदान?
दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पनवेलमध्ये 50.5 टक्के मतदानाची नोंद झाली आहे, तर सर्वाधिक 67.07 टक्के मतदान उरण मतदारसंघात झालं आहे.
• पनवेल 50.05 टक्के
• कर्जत 61.40 टक्के
• उरण 67.07 टक्के
• मावळ 55.42 टक्के
• चिंचवड 52.20 टक्के
• पिंपरी 50.55 टक्के