पाळीव पोपट वारंवार शिट्ट्या मारतो म्हणून मालकावर गुन्हा दाखल…!

51

पुणे दि. ८ (पीसीबी) – पुणे तिथे काय उणे, असे नेहमी म्हंटले जाते. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पोपट वारंवार शिट्ट्या मारतो आणि त्याचा त्रास आम्हाला होतो. म्हणून पोपटाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकबर अमजद खान या तरुणावर खडकी पोलीस स्थानकात विविध कलमाने गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात राहणारे अकबर अमजद खान यांनी एक पोपट पाळला आहे. हा पोपट सुरेश शिंदे यांना बघून शिट्या मारत होता. हे वारंवार होत असल्याने अखेर चिडलेल्या शिंदे यांनी खान यांना तुमचा पोपट माझी झोपमोड करतो, मला त्याच्या शिट्टीचा त्रास होतो. तुम्ही त्याला दुसरीकडे ठेवा, असे म्हणून शिवीगाळ केली. तर, मालकाविरोधात खडकी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.