पादचारी तरुणाची बॅग हिसकावली

257

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – रस्त्याने पायी जाणा-या तरुणाच्या हातातून दोन चोरट्यांनी बॅग हिसकावली. त्यात 16 हजारांचा ऐवज होता. ही घटना गुरुवारी (दि. 11) मध्यरात्री देहू-आळंदी रोड, मोशी येथे घडली.

अभय विठ्ठल सरवदे (वय 22, रा. मोशी. मूळ रा. लातूर) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देहू-आळंदी रोडने पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादीच्या हातातील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. त्यामध्ये 15 हजारांचा मोबाईल फोन, 500 रुपये रोख रक्कम, एक घड्याळ, एटीएम कार्ड असलेली बॅग असा 16 हजारांचा ऐवज होता. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.