पदमश्री नामदेव ढसाळ यांचे पूर येथे भव्य स्मारक उभारणार-मंञी शंभूराज देसाई

0
108

खेड, दि. १६ (पीसीबी) – विश्व साहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ साहित्य संमेलन त्यांच्या जयंतीनिमित्त दलित पँथर महा.राज्य व कुलस्वामिनी साहित्य परिषद यांच्या वतीने कनेरसर येथे कुलस्वामीनी सभागृहात नुकतेच संपन्न झाले. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून तसेच पदमश्री नामदेव ढसाळ व कामगार नेते मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष दादासाहेब गावडे,उदघाटक डाॅ.श्रीपाल सबनीस,प्रमुख पाहुणे उत्पादनशुल्क मंञी ना.शंभुराज देसाई,मा.खासदार शिवाजीराव आढळराव,स्वागताध्यक्ष अशोक तावरे,संयोजक महाराष्ट प्रदेश अध्यक्ष पॅंथर सुखदेव तात्या सोनवणे,प्रा.राजेंद्र सोनवणे, निमंञक शुभमदादा सोनवणे,अॅड.जयदेव गायकवाड,भगवान पोखरकर,अॅड,विजयसिंह शिंदे,अॅड.प्रकाश शितोळे,कवी म.भा.चव्हाण,श्रीकांत चौगुले,सुनीताराजे पवार,वि.दा.पिंगळे,डाॅ.सुरेश वाकचौरे,सुनिल थिगळे,काळुराम घोडके,मिलींद इंगळे,रमेश गोडसे,शांताराम पाटोळे,सरपंच अश्विनी साबळे,भाग्यश्री चव्हाण,सुनिता केदारी,दौलतराव सोनवणे,कृष्णराव ढसाळ इ.अनेक मान्यवर उपस्थित होते.

उदघाटक डाॅ.श्रीपाल सबनीस म्हणाले की,”काळ्या खडकावर विसावलेल्या काळ्या मातीवर उभे असलेल्या सह्याद्रीच्या कपारी मध्ये वसलेल्या वेळनदीच्या त्रिसंगम काठावर हिरवा शालू नेसलेल्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभवसंपन्न तालुका म्हणजे खेड तालुका होय, हुतात्म्यांच्या बलिदानाने पुनित झालेल्या संत ज्ञानेश्वरांच्या कर्तुत्वाने फुललेल्या महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यामाई मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माय भुमी मध्ये सर्व सामान्य दलित कुंटूबा मध्ये साहित्यरत्न पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा जन्म पूर कनेरसर या छोट्याशा गावात झाला, आपल्या मातृभुमिमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी मनामध्ये सामाजिक धार्मिक कार्य करण्याची धडपड अवघड छंद मनामध्ये बाळगून ज्याप्रमाणे काटेरी गुलाबाला लाल कळी येवून ती फुलून माणसंच मनमोहीत करते त्याचप्रमाणे विश्र्व साहित्यिक पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी खेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष म्हणून प्रयत्नवादी होवून अन्याय अत्याचार दादागिरी विषमता नष्ट करणे साठी अहोरात्र प्रयत्न केले, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची धारणा डोळ्यासमोर ठेवून दलित बांधवांचा न्याय हक्कासाठी लढा दिला त्यांनी अनेक पुस्तके लिहिली कवी लेखक साहित्यिक म्हणून जगप्रसिद्ध मिळाली “

पॅंथर नामदेव ढसाळ यांच्या मुळ जन्मगावी पुर, कनेरसर येथे
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. सन्माननीय अतिथी म्हणून उत्पादनशुल्क शुल्क मंत्री ना.शंभुराजे देसाई,मा.खासदार शिवाजीराव आढळराव,मा.आमदार जयदेवराव गायकवाड, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर,लोकनेते ॲड.विजयसिंह शिंदे, साहित्यिक म.भा.चव्हाण, राजेंद्र सोनवणे,सेवेकरी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुंगसे,संयोजन समिती अध्यक्ष दिलीपराव माशेरे व साहित्यप्रेमी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष साहित्यिक दादाभाऊ गावडे होते. संयोजक ,स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे होते.,साहित्य दिंडीत साहित्यिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

उत्पादनशुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांचे उचित स्मारक होण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगुन नामदेवराव ढसाळ व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधांना उजाळा दिला.

  संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी प्रास्ताविक केले.कनेरसर येथील थोर सुपुत्रांचा वारसा जतन करण्यासाठी संमेलन आयोजित करून अभिवादन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे मत त्यांनी  व्यक्त केले.

दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी नामदेवराव ढसाळ यांच्या स्मृती जागविल्या.साहित्य संमेलन ही नामदेवराव ढसाळांच्या विचाराचा वारसा जतन करण्यासाठी असल्याचे सांगितले.यावेळी साहित्यिक ॲड.प्रकाश शितोळे, पत्रकार इसाक मुलाणी,सुनिल थिगळे,काळुराम घोडके, उद्योजक मिलिंद पिंगळे,रमेश गोडसे,शांताराम पाटोळे सरपंच अश्विनी साबळे,भाग्यश्री चव्हाण,सुनीता केदारी ,दौलतराव सोनवणे पूरगावचे सुपूत्र माननीय श्री कृष्णराव ढसाळ आदी मान्यवरांना  नामदेवराव ढसाळ स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच साहित्य संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

   यावेळी नामदेवराव ढसाळांचे साहित्य क्षेत्रातील योगदान व ग्रामीण साहित्य चळवळीचे वास्तव यावर परिसंवाद झाला.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य कार्यवाह सुनीताराजे पवार, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले,वि.दा.पिंगळे.डाॅ.सुरेश वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले.

संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांनी साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान, विश्व साहित्यिक म्हणून मिळविलेला नावलौकिक याबाबत सविस्तर जीवनपट उलगडून सांगितला.नामदेवराव ढसाळ हे क्रांतिकारी,विद्रोही साहित्यिक होते,त्यांच्या मायभुमीत साहित्य संमेलन आयोजित केल्याबद्दल व त्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल संयोजकांचे श्रीपाद सबनीस यांनी आभार मानले. निमंत्रक शुभम सोनवणे यांनी आभार मानले