नोकरीच्या बहाण्याने सात लाख 33 हजारांची फसवणूक

0
153

वाकड, दि. २५ (पीसीबी) – नोकरी देण्याच्या बहाण्याने संपर्क करत वेगवेगळे टास्क देऊन एकाची सात लाख 33 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 5 एप्रिल 2023 ते 6 एप्रिल 2023 या कालावधीत वाकड येथे घडली. या प्रकरणी 24 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना प्रथम टेलिग्राम वर जॉब संदर्भात मेसेज केले. त्यानंतर टेलिग्राम ग्रुप मध्ये ऍड करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर तसेच यूपीआय आयडीवर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी यांना टास्क देण्याच्या बहाण्याने ज्यादा पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सात लाख 33 हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्यांना कोणतीही नोकरी न देता तसेच त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.