नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात

0
105

भंडारा, दि. १० (पीसीबी)- लोकसभा निवडणुका तोंडावर असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पटोले थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे.

प्रचार करून परतत असताना पटोले यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली. ट्रकच्या धडकेने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. काल (9 एप्रिल) रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना ही घटना घडली. ट्रकच्या धडकेत गाडीचा चुराडा झाला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार करून नाना पटोले परतत असताना ही धक्कादायक घटना घडली. अपघात इतका भीषण होता की, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवानं नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्व जण सुरक्षित आहेत.

सदर अपघाताबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ट्रकचं नित्रंयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज लावला जात आहे. भरधाव ट्रक ताफ्यात घुसून हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.

पटोले यांच्या तब्येतीबद्दल महत्त्वाची माहिती
दरम्यान, कालच महाविकास आघाडीने आपल्या जागा जाहीर केल्या. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारसभा आता सुरू झाल्या आहेत. मंगळवारी नाना पटोले यांनी भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधला.

त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांचा प्रचार देखील केला. हा प्रचार आटपून परत जात असतानाच त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. सुदैवाने अपघातात त्यांना कोणतीही इजा झाली नाही.