दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्णसधी, श्री मोरया इंस्टिट्यूट तर्फे मोफत पॅरामेडिकल कोर्सेस

0
386

चिंचवड,दि.०२(पीसीबी) – मोफत पॅरामेडिकल तसेच टेक्निकल अभ्यासक्रम मोरया सामाजिक प्रतिष्ठान च्या चिंचवड येथील हेरिटेज प्लाझा लिंक रोड येथील प्रशिक्षण केंद्रात सुरू करण्यात आले आहेत. सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश मोफत आहेत. प्रवेशासाठी मूळ कागदपत्रे आवश्यक असून प्रवेशाची अंतिम मुदत 12 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. सर्व अभ्यासक्रम पूर्ण वेळ असून त्याचे प्रैक्टिकल ट्रेनिंग हे आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे होणार आहे

संस्थेत सर्व अभ्यासक्रम हे महाराष्ट्र शासनाने मान्यता प्राप्त असून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांंना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. तरी प्रवेशासाठी मोरया सामाजिक प्रतिष्ठान, हेरिटेज प्लाझा, 3 रा मजला पिंपरी चिंचवड लिंक रोड, मोरया हॉस्पिटल समोर चिंचवडगाव व 9422036639 , 7744948000 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

श्री मोरया इंस्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल हेल्थ सायन्स चिंचवड गेल्या 18 वर्षांपासून पॅरामेडिकल तसेच टेक्निकल या विषयातील विविध अभ्यासक्रमातून चांगला समाज आणि व्यक्तिमत्त्व घडवून एकविसाव्या शतकातील विविध आव्हानांना पुढे जाण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करित आहे. विद्यार्थ्यांनी फक्त देशाकरीता मर्यादित न राहता जागतिक पातळीवर शैक्षणिक अभ्यासक्रम व उपक्रम घेणे, हा श्री मोरया इंस्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल हेल्थ सायन्स चा उद्देश आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी श्री मोरया इंस्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल हेल्थ सायन्स वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात .
*या वर्षी संस्थेत सर्व अभ्यासक्रम पूर्ण पणे मोफत असून सर्वानी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेच्या मते शिक्षणास इच्छूक प्रत्येक व्यक्ती, तरुण, गृहिणी, व्यावसायिक तसेच तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्यांला हे शिक्षण हे अगदी मोफत देऊन व कुणीही शिक्षणापासुन वंचित राहू नये, या उद्देशाने अशाप्रकारचे शिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

म्हणूनच श्री मोरया इंस्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल हेल्थ सायन्स हा उपक्रम सुरू केलेला आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि तुम्हाला आरोग्य सेवे च्या स्वप्नपूर्तीकडे एक पाऊल पुढे टाकण्याची सुवर्णसंधी देत आहे.