डी मार्टचा साडेतीन लाखांचा माल चोरीला

82

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – टेम्पोचे सील तोडून डी मार्ट कंपनीसाठी आणलेल्या मालातील साडेतीन लाखांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 18) पहाटे कृष्णा नगर चिंचवड येथे घडली.

विजय अरविंद पराडे (वय ४३, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. माळशिरस, सोलापूर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो चालक आहेत. त्यांनी त्यांच्या टेम्पो (एमएच 04/एचडी 2564) मध्ये मोशी येथील डिमार्टसाठी माल आणला होता. टेम्पो सील स्वरूपात असताना तो त्यांनी स्पाईन रोडवरील अश्विनी ह़ॉस्पीटलच्या शेजारी उभा केला होता. सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अज्ञाताने फिर्यादीच्या टेम्पोला उलटा टेम्पो लावला. फिर्यादीच्या टेम्पोचे सील तोडून टेम्पोतील डी मार्ट कंपनीसाठी आणलेले तीन लाख ४७ हजार २३ रुपयांचे खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, घरगुती वापराच्या वस्तू चोरून नेल्या. चिखली पोलीस तपास करीत आहेत.