ट्रॅव्हल्सच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
281

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला भरधाव ट्रॅव्हल्सने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी शनिवारी (दि. 24) सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास लांडेवाडी झोपडपट्टी भोसरी येथे घडली.

संजय रामभाऊ गव्हाणे (वय 43, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुन रामभाऊ गव्हाणे (वय 39) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार तुकाराम लिंबाजी यमगर (वय 31, रा. परळी वैजनाथ, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम याने त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स हायगायीने भरधाव चालवून फिर्यादी यांचा भाऊ संजय गव्हाणे यांना धडक दिली. संजय गव्हाणे हे रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. अपघात झाल्यानंतर आरोपी तुकाराम हा अपघाताच्या ठिकाणी न थांबता तिथून पळून गेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.