जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0
185

हिंजवडी, दि. १८ (पीसीबी) – जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारून सिमेंटचे पोल, तारेचे कंपाउंड तोडून नुकसान केले. तसेच नावाचा बोर्ड काढून दुसरा बोर्ड लावला. हा प्रकार २३ फेब्रुवारी रोजी मारुंजी गाव येथे घडला.

भगवान सिंग चित्तोडिया, त्याची पत्नी, भाऊ आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण प्रकाश बुचडे (वय ३८, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या तीन गुंठे जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. फिर्यादीस शिवीगाळ करून गॅस कटर आणि जेसीबीने जागेला असलेले सिमेंट पोल आणि तारेचे कंपाउंड तोडून नुकसान केले. फिर्यादी यांच्या नावाचा बोर्ड आणि कंपाउंडच्या तारा काढून चोरून नेल्या. तिथे भगवानसिंग चित्तोडिया या नावाचा बोर्ड लावला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.