जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल

229

ताथवडे, दि. ६ (पीसीबी) – जागेवर बेकायदेशीरपणे जमाव जमवून अतिक्रमण केले. तसेच सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 ऑगस्ट रोजी श्रीचंद आसवाणी प्लॉट्स नंबर 161, जीवननगर ताथवडे येथे घडली.रामकिसन सखाराम पारटकर (वय 51, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण प्रकाश बुचडे (वय 40, रा. हिंजवडी), संजय आगेलू (रा. ताथवडे), तुषार पवार, हरीश मगारामजी माळी (वय 50, रा. वाकड) आणि अन्य 20 ते 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथे सर्व्हेनंबर 161 मध्ये आसवानी असोसिएटस यांचे श्रीचंद आसवानी यांच्या नावाने 98 गुंठे जागा आहे. त्या जागेत आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून प्लॉटमध्ये घुसून, प्लॉटसाठी लावलेले गेटचे लॉक तोडून, सीसीटीव्ही कॅमेरे खराब केले. प्लॉटच्या सुरक्षा रक्षकाला आणि फिर्यादी यांना शिवीगाळ करून प्लॉटमधून जाण्यास सांगून दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.