जागा नावावर करून देतो असे म्हणत 35 लाखांची फसवणूक

122

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – जागा विक्रीच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका व्यक्तीची 35 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल 2021 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत भारत माता नगर, दिघी आणि न्यू गवळी कॉम्प्लेक्स, आळंदी रोड कॉर्नर, भोसरी येथे घडला.

अंबाजी विठोबा चव्हाण (वय 52, रा. भारतमाता नगर, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजाराम लक्ष्मण ढमाले (वय 58, रा. दिघी), शब्बीर इब्राहिम पटेल (वय 55, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना साडेतीन गुंठे जागा नावावर करून देतो असे सांगितले. त्याबाबत नोटरी विसार पावती करारनामा करून फिर्यादीकडून 35 लाख रुपये घेतले. मात्र त्यांच्या नावावर जागा करून न देता तसेच दिलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.