जडीबुटी देण्याच्या बहाण्याने चार लाखांची फसवणूक

20

चाकण, दि. २२ (पीसीबी) – विविध आजारांवरील आयुर्वेदिक औषधे देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन चार लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 9 मे ते 28 ऑगस्ट या कालावधीत माणिक चौक चाकण येथील कृष्णा आयुर्वेदिक जडीबुटी भांडार येथे घडली.

अश्विनी दत्तात्रय शिंदे (वय 26, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेमराज उमाजी गोसावी (वय 19), संजीव लिंबाजी गोसावी (वय 30), विश्वजित लिंबाजी गोसावी (वय 22, रा. चाकण), डॉ. रमेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना चार लाख रुपयांची आयुर्वेदिक औषधे दिली. त्याचा फिर्यादी यांना काहीही परिणाम झाला नाही. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह अन्य लोकांना दृष्टी येईल, मुके बोलू लागतील, मणक्याचे आजार बरे होतील, संतती प्राप्त होईल अशा बहाण्याने गंडा घातला आहे. पोलिसांनी प्रेमराज, संजीव आणि विश्वजित या तिघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.