कंपनीतून दोन लाखाचे साहित्य चोरीला

271

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – चिंचवड एमआयडीसी मधील अग्रवर्ती प्रोसेस इंजिनीअर्स या कंपनीतून चोरट्याने दोन लाखाचे इबारा पंप चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सकाळी उघडकीस आली.

सुनील विनायक शिंपी (वय 50, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी चिंचवड मध्ये अग्रवर्ती प्रोसेस इंजिनिअर्स प्रा ली ही कंपनी असून या कंपनीच्या बाजूने एक ओढा वाहत आहे. ओढ्याच्या बाजूने चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून एक लाख 98 हजार 712 रुपये किमतीचे दोन इबारा पंप चोरट्यांनी चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.