इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार..! रुग्णालयात दाखल

206

विदेश,दि.०३(पीसीबी) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात इम्रान खान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या पायाला जखम झाल्याचं सांगितलं जात आहे.

गोळीबारानंतर एकच गदारोळ सुरु झाला होता. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना अटक केली आहे. याबाबत जिओ न्यूजने वृत्त दिलं आहे.