आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन

0
595

दि. २५ (पीसीबी) – भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या ६५ वर्षाच्या होत्या. त्यांच्यामागे पती, मुले आमदार महेश लांडगे, टाटा मोटर्स युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, उद्योजक कार्तिक लांडगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी भोसरी येथील तळ्याकाठी स्मशानात सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.