पिंपरी, दि.१६ (पीसीबी)- काल दिनांक 15 फेब्रुवारी रोजी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर व मातोश्री रमाबाई महिला बचत गट गंगानगर प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने व मीनाताई जावळे (आप शहराध्यक्ष) ह्यांच्या वतीने निगडी पोलीस स्टेशन मधील सर्व महिला भगिनी यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी निगडी पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीमती तेजस्विनी कदम ह्यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, नागरिकांनी पोलिसांसोबत असेच मैत्रीपूर्व संबंध ठेवावे जेणेकरून नागरिकांना पोलिसांची भीती न वाटता त्यांना एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होईल.
यावेळी सौ. मीनाताई जावळे (आप शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर), ज्योतीताई शिंदे, कल्याणी चाकणे, नूर जहान मुलानी, सुजाता बनसोडे, करुणा कांबळे, वैशाली ओव्हाळ व आम आदमी पार्टीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.












































