अवघ्या काही सेकंदात दोन लाखांची रोकड पळवली

145

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – दुचाकी स्वार लघुशंका करत असताना अवघ्या काही सेकंदात चोरट्याने दुचाकीची डिक्की उघडून दोन लाख रुपये चोरून नेले. ही घटना 28 डिसेंबर 2023 रोजी पिंपरी गाव येथे घडली.

शंकर अभिमन्यू गायकवाड (वय 32, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे 28 डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पिंपरी गाव येथून दुचाकीवरून जात होते. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये दोन लाख रुपये रोख रक्कम होती. ते जुना काटेपिंपळे रोड येथे लघुशंकेसाठी थांबले असता अवघ्या काही सेकंदाच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुचाकीची डीक्की उघडून त्यातून दोन लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.